SBI e-Mudra loan: या योजनेअंतर्गत भारतातील नागरिकांना मिळणार आता १० लाखापर्यंत कर्ज.
जर तुम्हाला व्यवसायासाठी पैसे पाहिजे असतील. आणि यासाठी तुम्हाला कोणाकडून तरी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही कोणालाही विचारले तर तुम्हाला काही ना काही वस्तू गहाण ठेवावी लागते. त्यानंतर तुम्हाला त्या बँका किंवा व्यक्ती कर्ज देतो. मात्र या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणतीही वस्तू गहाण ठेवायची आवश्यकता नाही.
केंद्र सरकारने 2015 साली देशातील लघु उद्योजकांसाठी पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली होती.
कोणतेही लघुउद्योजकाला आपला व्यवसाय मोठा करण्यासाठी आर्थिक मदत पाहिजे असेल तर त्यांना SBI e-Mudra loan योजने अंतर्गत 10 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या व्यक्तींचे खाते हे SBI बँकेत असेल तर त्याला लवकरात लवकर हे कर्ज मिळेल.
विशेष म्हणजे SBI e-Mudra loan योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना या कर्जावर 08.40 ते 12.35 टक्के इतका व्याजदर आकारला जातो. त्याच बरोबर महिला उद्योजकांचा व्यवसाय सुरळीत आणि चांगला असेल तर त्यांना सहा महिन्याचे व्याज ही माफ केले जाते. SBI e-Mudra loan या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार नागरिक हा 18 ते 65 वयोगटांमध्ये असला पाहिजे.
SBI e-Mudra loan: या योजनेअंतर्गत कर्ज काढण्यासाठी दोन पद्धती आहेत. त्या दोन पद्धती म्हणजे
ऑफलाइन आणि ऑनलाईन या आहेत. ऑफलाइन पद्धतीने कर्ज काढायचे असेल तर तुम्हाला नजदीक
शाखेशी संपर्क साधून या कर्जासाठी तिथे अर्ज द्यावा लागतो.
ऑनलाइन पद्धतही सोपी आहे. ऑनलाइन पद्धतीने आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरून अर्ज करू
शकतो. अर्ज करण्यासाठी आपल्याला SBI e-Mudra loan
च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. आणि
त्या ठिकाणी विचारलेल्य प्रश्नांची उत्तरे देत आपला अर्ज पुर्ण करावा
SBI e-Mudra loan ची अधिकृत संकेतस्थळ पुढील प्रमाणे 👇👇👇👇👇👇👇👇
https://emudra.sbi.co.in:8044/emudra/basic-details
0 Comments