नागरिकांना आता घरबसल्या आधारशी संलग्न मोबाइल
पडताळणी करण्याची सुविधा
Verify mobile number with Aadhaar
AADHAR Update 2023
वापरकर्त्याचे
फायदे लक्षात घेऊन, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ने नागरिकांना आधारशी संलग्न ईमेल/मोबाइल क्रमांकाची पडताळणी
करण्याची परवानगी दिली आहे.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाला असे आढळून आले की काही
प्रकरणांमध्ये , नागरिकांना
त्यांचा कोणता मोबाईल क्रमांक त्यांच्या आधारशी जोडला
आहे याबद्दल माहिती किंवा खात्री नव्हती. त्यामुळे आधार ओटीपी दुसऱ्या कुठल्यातरी
मोबाईल क्रमांकावर जात असल्याची भीती नागरिकांना वाटत होती. आता या सुविधेमुळे
नागरिकांना अगदी सहजपणे हे तपासता येईल.
अधिकृत संकेतस्थळावर (https://myaadhaar.uidai.gov.in/) किंवा mAadhaar ऍपद्वारे
‘'व्हेरिफाय
ईमेल /मोबाईल नंबर ' शीर्षकाखाली ही सुविधा उपलब्ध आहे.
नागरिकांना त्यांचा स्वतःचा ईमेल/मोबाईल क्रमांक संबंधित आधारशी जोडलेला आहे की
नाही याची पडताळणी करण्यासाठी हे विकसित केले आहे.
ही
सुविधा नागरिकांना खात्री पटवून देते की त्याच्या/तिच्या माहितीनुसार ईमेल/मोबाईल
क्रमांक संबंधित आधारशी जोडलेला आहे. तसेच एखादा विशिष्ट मोबाइल क्रमांक
संलग्न नसल्यास तसे नागरिकांना सूचित करते आणि नागरिकांची इच्छा असल्यास, मोबाइल क्रमांक अपडेट करण्यासाठी आवश्यक
पावले उचलण्याची सूचना करते.
जर
मोबाईल क्रमांकाची आधीच पडताळणी झाली असेल तर नागरिकांना त्यांच्या स्क्रीनवर , ‘तुम्ही प्रविष्ट केलेला मोबाइल क्रमांक आमच्या
नोंदीशी यापूर्वीच पडताळून पाहण्यात आला
आहे’ असा संदेश दिसेल.
जर
नागरिकांना नावनोंदणी दरम्यान दिलेला मोबाईल क्रमांक आठवत नसेल, तर Myadhaar पोर्टल किंवा mAadhaar ऍपवर Verify
Aadhaar शीर्षकावर
मोबाईल क्रमांकाचे शेवटचे तीन अंक तपासून पाहता येतील.
जर नागरिकांची ईमेल/मोबाइल क्रमांक
आधारशी जोडण्याची इच्छा असेल किंवा तिला/त्याचा
ईमेल/मोबाइल क्रमांक अपडेट करायचा असेल, तर ती/तो जवळच्या आधार केंद्राला भेट
देऊ शकतो.
आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.
हि माहिती तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर
करा. यामुळे त्यांचा नक्कीच फायदा होईल.
0 Comments